महात्मा गांधी विद्यामंदिरात तालुकास्तरीय विज्ञान मेळावा

तळेबाजार येथे अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न
Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 02, 2025 15:32 PM
views 140  views

देवगड  : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळावा सन 2025 महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार या ठिकाणी दिनांक एक ऑगस्ट रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप शेठ तेली यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर ईशस्तवन स्वागत गीत व विज्ञान गीत प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सादर करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्वांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी व्यासपीठावर तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ तळेबाजार या संस्थेचे अध्यक्ष संदीप शेठ तेली ,उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार  संतोष वरेरकर, सचिव  कृष्णा साटम, सदस्य बाळकृष्ण पारकर,  विश्वास सावंत, संजय जाधव, तसेच शिक्षक परिषदेचे पदाधिकारी भरत केसरकर  , सचिन कुडाळकर, तसेच रुपेश पाटील, देवगड हायस्कूलचे शिक्षक येडगे सर, परीक्षक म्हणून आयटीआय जामसंडेचे शिक्षक सुरज भिडे, देवगड ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका पूजा कोकितकर मृणाली ढोके सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे जिल्हा संघटक व पेंढरी हायस्कूलचे मुख्याध्यापक लाडगावकर सर व देवगड तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष कर्ले सर तळेबाजार प्रशालेचे मुख्याध्यापक वाळके सर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील आठ शाळांनी सहभाग घेतला होता.क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता व आव्हाने हा या स्पर्धेचा विषय होता.यामध्ये प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी वृषाली धनंजय कुळये , द्वितीय क्रमांक मुणगे हायस्कूलचा विद्यार्थी दीक्षांत मांजरेकर व तृतीय क्रमांक देवगड हायस्कूलचे विद्यार्थिनी नागरगोजे यांनी पटकावला.विजेत्याना आकर्षक चषक व सन्मानपत्र देऊन  गौरविण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेली सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कदम सर यांनी केले.