कुडाळमध्ये भाजपा कार्यकर्ता मेळावा...!

Edited by: भरत केसरकर
Published on: April 05, 2024 05:47 AM
views 266  views

कुडाळ : महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे कुडाळ तालुका भाजपा कार्यकर्ता मेळावा होत आहे. कुडाळ तालुका कार्यकारणीची बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स, सरपंच, उपसरपंच, सोसायटी अध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी हे या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल आणी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.