तळकट उपसरपंचपदी रमाकांत गवस बिनविरोध

लोकनियुक्त सरपंच सुरेंद्र सावंत यांनी केलं स्वागत
Edited by: संदीप देसाई
Published on: December 30, 2022 18:22 PM
views 202  views

दोडामार्ग : विरोधकांना चारी मुंड्या चित करत निर्विवादपणे भाजप पुरस्कृत संपूर्ण पॅनल निवडून आणणाऱ्या तळकट ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सुरेंद्र सावंत यांनी डबल धमाका गिफ्ट दिले आहे. तळकट ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रमाकांत सावंत यांची बिनविरोध निवड केली आहे. 

 दोडामार्ग तालुक्याचे लक्ष लागलेल्या तळकट ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदी सुरेंद्र सावंत-भोसले यांनी दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठ्या मताधिक्याने मोठा (२७०) विजय मिळविला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा उपसरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांच्याच पॅनलचे रमाकांत गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मतदारांनी ज्या विश्वासाने आम्हाला प्रचंड मतांनी निवडून दिले तो विश्वास सार्थकी लावू, सर्वांना विश्वासात घेऊन विकास करू असे प्रतिपादन नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांनी केलं आहे. यावेळी उपसरपंच रमाकांत गवस, सदस्य शशिकांत राऊळ, विवेक मळीक, पुर्वी सावंत, दीव्या राऊळ, सुवर्णा मळीक उपस्थित होते. दरम्यान या नव्या टीमचं  स्वागत माजी सरपंच एम.डी.धुरी, माजी प्राचार्य दुर्गाराम गवस, अंकुश वेटे, सुनेत्रा नांगरे, भिकाजी जोशी, भरत सावंत यांनी केले.

या कार्यक्रमाला अभय सावंत, विठ्ठल देसाई, संदेश डांगी, बाळु घाडी, विशाल राणे, सुरज गवस,प्रणव गवस, विक्रांत सावंत, ऋषी राऊळ, राघोबा राऊळ, प्रज्योत देसाई, चंद्रास राऊळ इत्यादी उपस्थित होते.