
दोडामार्ग : कोलझर केंद्र स्तरीय स्पर्धेत अव्वल गुणांसह चॅम्पियन्सशिप मिळवल्यानंतर सर्व विद्यार्थी खेळाडूंनी प्रभाग स्तरावरील स्पर्धेत क्रीडा कौशल्य पणाला लावून सांघिक आणि वैयक्तिक क्रिडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली आहे.
यामध्ये इशिका धनंजय धुरी उंच उडी प्रथम,मानस कृष्णकांत राणे 50 मीटर धावणे द्वितीय, इशिका धनंजय धुरी 50 मीटर धावणे प्रथम, अंश अभयसिंह सावंतभोसले लांब उडी प्रथम, रुची राघोबा राऊळ उंच उडी द्वितीय सांघिक खोखो कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे.
तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी श्री. नदाफ , तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, पोलीस पाटील श्री रामदास देसाई,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मी डांगी उपाध्यक्ष नामदेव मळीक, माजी विद्यार्थी संघ तळकट, सर्व ग्रामस्थ, सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक जनार्दन पाटील, गोरख जगधने, कमलाकर राऊत, अरुण पवार, शरयू परब शिक्षक वर्गाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .










