तळकट ग्रा.पं. - लोकमान्य सोसायटीकडून वृक्षारोपण

Edited by: संदीप देसाई
Published on: July 03, 2023 15:34 PM
views 288  views

दोडामार्ग : तळकट ग्रामपंचायत व लोकमान्य मल्टीपर्पज को ऑफ सोसायटी लिमिटेड कडून संयुक्तपणे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. शाखा व्यवस्थापक उमेश परब व सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी परब यांनी वृक्षारोपणाचे फायदे तसेच बँकेच्या वैशिष्ट्य, योजनांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तर तळकट ग्रामपंचायत सातत्याने विविधांगी उपक्रम राबवत असल्यामुळे या ग्रामपंचायतची वृक्षारोपणासाठी निवड केल्याचे सांगितले. 

           यावेळी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, उपसरपंच रमाकांत गवस,  बँक कर्मचारी साईनाथ घाणेकर, सर्वेश प्रभू, ज्ञानेश्वर एडवे, कृषी सहाय्यक गणेश लोखंडे, माजी सरपंच एम.डी. धुरी, विजयकुमार मराठे, दुर्गाराम गवस, गोविंद देसाई, अजित सावंत, प्रज्योत देसाई, साई नाटेकर, तळकट प्राथमिक शाळा मुख्याध्यापक अरुण पवार, आरोग्य सेवक सोच, इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.