तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत तळवडे विद्यालयाचे घवघवीत यश..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2023 12:35 PM
views 61  views

सावंतावडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व तालुका व्यवस्थापन समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत तळवडे येथील श्री जनता विद्यालयाने विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विविध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

१४ वर्षे वयोगटातील स्पर्धेत एकूण १९  खेळाडू सहभागी झाले होते यापैकी १४ खेळाडूंनी विशेष प्राविण्य संपादन केले आहे पूजा तुकाराम सावंत हिने १०० मीटर धावणे व ४०० मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला तर सुरेखा हरी केरकर यांनी २०० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. रंजना प्रवीण परब हिने २०० मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. श्रावणी यशवंत दळवी हिने ६०० मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. ४×१०० दिले स्पर्धेत पूजा तुकाराम सावंत, रंजना प्रवीण परब, तन्मयी संदेश पावणोजी, सुरेखा हरी केरकर, साक्षी संदीप पेडणेकर या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तसेच ४×१०० रिले स्पर्धेत गुरुनाथ रमाकांत मांजरेकर, यशवंत दत्ताराम तळवणेकर, रामचंद्र भरत नेमन, सुरज सिताराम गावडे, निखिल विजय सोनवणे या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

१७ वयोगटातील स्पर्धेत एकूण १६ खेळाडू सहभागी झाले होते यापैकी ९ खेळाडूंनी विशेष प्राविण्य संपादन केले. ४०० मीटर धावणे स्पर्धेत महादेव सगुण चेंदवणकर याने प्रथम क्रमांक तर श्रवण संतोष परब याने तृतीय क्रमांक पटकावला. मैथिली मंगेश कामत हिने ४०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक तर ८०० मीटर धावणे या स्पर्धेत विभावरी प्रशांत मांजरेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. ४×१०० रिले स्पर्धेत आयुष विकास नाईक, महादेव सगुण चेंदवणकर सर्वेश संतोष जाधव, साहिल लक्ष्मण सातार्डेकर, सिद्धार्थ काशिराम कुंभार या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

या सर्व यशस्वी खेळाडूंना ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तथा पर्यवेक्षक दयानंद बांगर, क्रीडा विभाग प्रमुख विजय सोनवणे, क्रीडा शिक्षक शांताराम गवई, दिलराज गावडे, प्रवीण गोडकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई पर्यवेक्षक दयानंद बांगर तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.