
सिंधुदुर्गनगरी : शिक्षक शिक्षकेतर यांच्या प्रस्तावावर शिक्षणाधिकारी कार्यालयातून तोंडी व लेखी विनाकारण त्रुटी काढून प्रस्तावास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. आपल्या किरकोळ कामांसाठी सुद्धा या कर्मचाऱ्यांना वारंवार हेलपाट्या माराव्या लागतात असे सांगतानाच मात्र पैसे घेऊन कामे जलद केली जातात असा खळबळ जनक आरोप शिक्षक भारती संस्थेचे संजय वेतुरेकर यांनी केला आहे. संजय वेतुरेकर यांनी शुक्रवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या दालनाबाहेर जमिनीवर बसून आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आगळं वेगळं आंदोलन छेडलं यावेळी त्यांनी आपला संताप व्यक्त केला. शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत साखळी धरणे आंदोलन केले जाणार आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी किती वेळा फेऱ्या मारायचा असा सवाल करत आता आपला नाविलाज झाला असून, आपण या ठिकाणी आत्मक्लेष आंदोलनासाठी बसलो असल्याचे श्री वेतुरेकर यांनी सांगितले.
शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न.
शिक्षक-शिक्षकेतरांची कामे आपल्या कार्यालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्या सर्व कामांची पूर्तता करणे. सर्व प्रस्तावासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची उर्वरित चेक लिस्ट लेखी जाहीर करावी.पवित्र पोर्टल वरून आलेल्या व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांना त्वरित मान्यता मिळावी.वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी या प्रस्तावाना त्वरित मान्यता द्यावी. NPS कटिंग च्या बाबतीत अनियमितता दूर करावी. कर्मचाऱ्यांच्या PF पावत्या वेळेवर देणेबाबत कार्यवाही व्हावी. जिल्यातील थकीत वेतन मंजूर होऊनही अद्याप अदा होत नाही, याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी.सन. 2024 या आर्थिक वर्षात प्रलंबित राहिलेले प्रस्ताव येत्या दोन महिन्यात अग्रक्रमाने मंजूर करावेत. निवृत्त होणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांची कामे व प्रस्तावांची अग्रक्रमाणे पूर्तता करावी.
थकीत वेतन प्रस्ताव जाणीवपूर्ण परिपूर्ण न पाठवणे. याबाबत योग्य ती काळजी घेऊन प्रस्ताव परिपूर्ण पाठवावे. व त्रुटी वेळेत पूर्ण न करून घेणे.वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावाना त्वरित मान्यता द्यावी. अशी वारंवार मागण्या निवेदने दिली तरीही आपल्यावर व आपल्या कार्यालयावर काहीच परिणाम होत नसल्याने शिक्षक भारती संघटनेच्या वतीने 15 ऑक्टोबर 2025 ते 17 ऑक्टोबर 25 दुपारी 3 ते 5 या वेळेत साखळी धरणे आंदोलन करत आहोत याची गांभीर्याने नोंद घ्यावी. आंदोलन कर्त्यांच्या जीवितास धोका पोहोचल्यास सर्वस्वी आपली जबाबदारी राहील. तरी लवकर कामे मार्गी लावावीत अशी विनंती केली आहे.










