
सावंतवाडी : ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्रे व गुरांचा बंदोबस्त करा अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मोकाट जनावरांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून फुटपाथवर फिरताना कुत्रे आणि गुरांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे नगरपालिका हद्दीत कोंडवाडा स्थापन करून त्यात गुरे दाखल करावीत अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, बळवंत मसुरकर, प्रा.एम.व्ही. कुलकर्णी, प्रा.दिलीप गडकर, प्रदीप पियोळकर, अरुण मेस्त्री, शंकर प्रभू, प्रदीप ढोरे, अशोक बुगडे, मुकुंद वझे, प्रकाश मसुरकर, प्रदीप ढोरे, श्यामसुंदर भाट आदी उपस्थित होते.