मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

देवगड रिक्षा चालक-मालक संघाचं निवेदन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 14, 2023 20:04 PM
views 125  views

देवगड : देवगड रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष यांना देवगड शहरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा तसेच मोकाट सुटलेल्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

 

या निवेदनात असे म्हटले आहे की, देवगड जामसंडे शहरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम बंद केली आहे. परिणामी शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद पुन्हा एकदा वाढला असून,त्याचा नागरिकांना तसेच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी 13 ऑगस्ट रोजी देवगड कॉलेज रोड येथे रिक्षा समोर कुत्रा आडवा आल्याने मळई येथील आपल्या सासरवाडीला जाणाऱ्या संतोष केळुसकर यांची रिक्षा पलटी होऊन रिक्षांमधील नातेवाईकांना दुखापत झाली. व त्यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु संतोष केळुसकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारांसाठी त्यांना कणकवलीत हलविण्यात आले होते.

या सर्व घडलेल्या प्रकाराचा आपण गांभीर्याने विचार करावा व शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा व गुरांचा बंदोबस्त नगरपंचायत मार्फत करावाअशा आशयाचे निवेदन देवगड शहर रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना देण्यात आले. यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अनंत वाडेकर,माजी अध्यक्ष अनिल बांदकर, रवींद्र कांदळगावकर, सिद्धार्थ नारायणकर, केतन कुबडे, दाजी राजम,रवींद्र गिरकर,इत्यादी उपस्थित होते.