
कुडाळ : कुडाळ महसूल उपविभागातील बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाळू वहातुकीवर दंडात्मक कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगटाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सायंकाळी कुडाळ प्रांत ऐश्वर्या कालुसे यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक कार्याध्यक्ष काका कुडाळकर सरचिटणीस सावळाराम अणावकर, आर के सावंत सर्वेश पावसकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी केली.
कुडाळच्या प्रांत ऐश्वर्या काळूसे यांची भेट घेत बेकायदेशीर वाळू वाहतूक उत्खनन याबाबत सविस्तर चर्चा केली या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेला वाळू मोठी किंमत देऊन घ्यावी लागते. यामुळे अशा वाळू वाहतुकीवर तात्काळ कारवाई करा वाळू वाहतुकीचे डंपर जप्त करा असे काका कुडाळकर यांनी प्रांतांना सांगितले. तर जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कायदेशीर वाळू या विभागात का होत नाही असा सवाल केला. त्यांनी खनीकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधीत चर्चा केली मेरी टाईम बोर्डाने या उपविभागात परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत वरिष्ठ पातळीवर आपण पाठपुरावा करणार असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या धोरणानुसार कुडाळ येथे रु. ६००/- प्रती ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करुन देणेबाबत याशिष्टमंडळाने प्रांताना दिलेल्या निवेदनात म्हटले की महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेस स्वस्त दराने वाळू मिळावी याकरीता दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रती ब्रास रु. ६००/- प्रमाणे वाळू सध्या कुडाळ येथे उपलबध होत नाही. कुडाळ तालुका व आजूबाजूच्या परिसरात आज मोठ्या प्रमाणात खाजगी व शासकीय बाधकामे सुरु आहेत, तर शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आज दामक्रमट दराने चोरीची वाळू घेवून बांधकाम करावे लागत आहे. याचा विचार करावा रु. ६००/- प्रमाणे वाळु मिळणे अत्यंत आवश्यक वाटते. आज शासनाने विजयदुर्ग येथे अधिकृत डेपो सुरु करणार bअसल्याचे समजलते. परंतु कुडाळ व विजयदुर्ग याचा विचार करता येथील जनतेस ती वाळू फारच महाग पडणार आहे, कुडाळ व मालवण मधील कर्ली नदीत आज बरोच वर्ष शासन वाळू उत्खननास परवानगी देत आलेली आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर येथील जनतेस रु. ६००/- ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी केली.