मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Edited by:
Published on: November 22, 2024 11:07 AM
views 267  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी तहसील कार्यालय परिसरात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होऊन दुपारी बारा, एक पर्यंत मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. 

मतमोजणीचे प्रशासनस्तरावर नियोजन करण्यात आले आहे.  तहसीलद कार्यालय सावंतवाडी येथे मतमोजणी प्रकिया पार पडणार आहे. २३ फेऱ्याअंती निकाल स्पष्ट होणार आहे. प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी व एक मायक्रो ऑबझरवर असे कर्मचारी असतील. एका फेरीत १४ पेट्यांचा निकाल हाती येणार आहे‌. मतमोजणीवेळी उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी व काउंटींग एजंट यांना आतमध्ये परवानगी असेल. चोख पोलीस बंदोबस्त व व्यवस्थापन मतमोजणीसाठी करण्यात आले आहे‌.२३ व्या फेरीनंतर कोणी बाजी मारली हे स्पष्ट होणार आहे. याबाबतची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.