स्विफ्टचे स्टेअरिंग लॉक ; समोरून येणाऱ्या अल्टोला धडक

Edited by: लवू परब
Published on: May 29, 2025 14:06 PM
views 362  views

दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी मार्गाने घाट माथ्यावर लग्न कार्यास जाणाऱ्या स्विफ्ट कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने समोरून येणाऱ्या अल्टो कारला धडक बसून मोठा अपघात झाला. हा अपघात कसई दोडामार्ग केळीचे टेब येथे गुरुवारी सकाळी घडला. या अपघातात मदन कृष्णा सावंत ( 67 ) रा. कोलझर, सुभाष कुंभार (40 ) सध्या राहणा गोवा, राजेंद्र कुंभार, सत्यवान तुकारम धरणे ( 50 ) साटेली भेडशी, 

हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले आहे. तर सत्यवान कुंभार ( 26 ) व रोहित सिंग ( 25 ) रा.गोवा हे किरकोळ जखमी असून त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. तर अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्ग तिलारी मार्गावर केळीचे टेम येथे दोन चार चाकी मध्ये समोरा समोर अपघात झाला. स्विफ्ट कारचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. गोवा येथून स्विफ्ट कारने घाटमाथ्यावर लग्न कार्यास जात असताना दोडामार्ग केळीचे टेम येथे कार पोहचली असता कारचे स्टीअरिंग अचानक लॉक झाले. त्यामुळे समोरून येणाऱ्या अल्टो कारला स्विफ्टची जोरदार धडक बसली ही धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही कार मधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले.

स्थानिकांनी मदत कार्य करून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमिना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले. मात्र चार जणांना जबर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले. तर दोघांना प्राथमिक उपचार करण्यात आले. असल्याचे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली.