संजीवन संगीत अकादमीमार्फत स्वरसंध्या मैफिलीचे आयोजन

श्रीराम वाचन मंदिर येथे होणार सायंकालीन मैफल
Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 15, 2023 13:35 PM
views 114  views

             पणजी येथील संजीवन संगीत अकादमी आयोजित स्वरसंध्या मैफिलीचे आयोजन 20 मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजता श्रीराम वाचन मंदिर येथे करण्यात आले आहे.

  या मैफिलीचे सादरकर्ते डॉ. प्रवीण गावकर, वसीम खा, पल्लवी पाटील, सिया पै, अश्विनी अभ्यंकर हे आहेत. त्यांना साथसंगत दत्तराज शेट्ये, सुभाष फातरपेकर, मनीष तांबोस्कर, बालकृष्ण परब करणार आहेत.

  शास्त्रीय गायन, वादन आणि सुगम संगीताच्या या सायंकालीन मैफिलीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकानी केले आहे.