
सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वाच्या टप्प्यात बांदा मंडल अध्यक्षपदी स्वागत नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वागत नाटेकर हे इन्सुली ग्रामपंचायतीचे सदस्य असून, ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा संयोजक अभियंता सेल मंदार कल्याणकर यांच्यासह महेश धुरी, नारायण कांबळी, अशोक सावंत, दादू कविटकर, मधु देसाई, प्रवीण देसाई, उमेश पेडणेकर, उमेश पेडणेकर, नंदू पालव, सिद्धेश पावसकर, गुरु कल्याणकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत नाटेकर यांच्या नियुक्तीमुळे बांदा मंडळात पक्षाच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास महेश सारंग यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत नाटेकर यांचे अभिनंदन करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वागत नाटेकर यांची ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.