नेरूर वाघोसे शाळेचे सुयश..!

Edited by:
Published on: April 11, 2024 06:57 AM
views 282  views

कुडाळ : जिल्हा परिषद शाळा गणेश विद्यालय नेरूर वाघोसे शाळेने विविध परीक्षा, स्पर्धामध्ये अभिनंदनीय यश संपादन केले आहे. युवा संदेश प्रतिष्ठान ची सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे यामध्ये वाघोसे शाळेचे पाच विद्यार्थी सहभागी झाले होते.

त्यात सर्वांनी चांगले यश संपादन केले असून कुमारी प्राजक्ता रामचंद्र शृंगारे हिने गोल्ड मेडल मिळविले आहे. त्याच बरोबर ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत कुमारी प्राजक्ता शृंगारे विद्यार्थिनीला ब्रॉन्झ मेडल मिळाले.  ज़िल्हा परिषद तर्फे घेण्यात येणाऱ्या बाल कला क्रीडा महोत्सव मध्ये ज्ञानी मी होणार स्पर्धेत विजेता होऊन बिट स्तरापर्यंत मजल शाळेनी मारली होती. याच बरोबर नेरूर गाव मर्यादित सगळ्या शाळांचा सहभाग असलेली ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळ नेरूर आयोजित ज्ञानी मी होणार या विशेष स्पर्धेतही वाघोसे शाळेने प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले. नवजीवन वाघोसेवाडी मित्र मंडळ आयोजित निमंत्रित शाळांची दरवर्षी मानाची खापरी चषक स्पर्धा होत असते या स्पर्धेत कला, क्रीडा, अभिनय, वेशभूषा आणि बुद्ध्यांक याचा कस लागणारे क्रीडा प्रकार असतात.

या स्पर्धेत वाघोसे शाळेने जनरल चॅम्पियनशिप मिळवत कौतुकास्पद कामगिरी केली होती. वर्ष भरात असे विविध उपक्रम स्पर्धा मध्ये सहभागी होऊनविविध क्षेत्रात कमी पटसंख्या असूनही यश मिळविल्या बद्दल नेरूर गावचे सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ फडके, प्रवीण नेरुरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ संजना संजय परब, शिक्षणप्रेमी प्रभाकर रामचंद्र शृंगारे, उपाध्यक्ष स्वाती सचिन शृंगारे, सदस्य चंद्रशेखर परब, सौ. माया रामचंद्र शृंगारे, सौ.ममता महेश परब, सुनील परब, पालक रामचंद प्रभाकर शृंगारे, संजय गोविंद परब, महेश भास्कर परब, सौ. सुनीता सुनील परब आदि, वाघोसे ग्रामस्थ तसेच तत्कालीन केंद्रप्रमुख श्री उदय शिरोडकर सर, केंद्रप्रमुख चव्हाण सर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक जनार्दन पाटील आणि शिक्षिका शरयू परब यांचे अभिनंदन केले आहे.