सिमरन डोईफोडेचं सुयश..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2023 12:16 PM
views 94  views

सावंतवाडी : शासनाच्या क्रीडा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग मार्फत घेण्यात आलेल्या 19 वर्षे वयोगटाखालील तालुकास्तरीय शालेय  स्पर्धेत सावंतवाडी येथील कळसुलकर  इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीत शिकत शिकणारी कुमारी सिमरन शेखर डोईफोडे हिने थाळीफेक व गोळा फेक दोन्ही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच  इयत्ता बारावीतील कुमारी सानिया जाधव हिने 100 मीटर रिले व 1500 मीटर रिले या दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या दोघींची ही  जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून थाळीफेक, गोळा फेक, 100 मीटर रिले , 1500मीटर रिले मधील यशस्वी कामगिरी बद्दल निलेश धारगळकर, प्राचार्य नारायण मानकर सर, सर्व शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच संस्थाचालक  यांचेकडून हार्दिक अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.