अबॅकसमध्ये गार्गी धुरीचं सुयश..!

Edited by:
Published on: February 03, 2024 15:09 PM
views 94  views

बांदा : इस्लामपूर येथे झालेल्या अबॅकस परीक्षेत शेर्ले कापईवाडी येथील गार्गी पुष्पराज धुरी विद्यार्थिनी पहिली आली. बांदा येथील पुर्वी संजय आरोलकर विद्यार्थिनी सहावी आली. परीक्षेत एक हजार मुलांनी सहभाग घेतला होता. 10 मिनिटात 120 प्रश्न या परीक्षेत सोडवायचे असतात.


गार्गी धुरी व पूर्वी आरोलकर यांना बांदा येथील एकलव्य अकँडमीच्या शिक्षिका स्नेहा केसरकर यांनी मार्गदर्शन केले. पूर्वीने याअगोदर कोल्हापूर येथे झालेल्या परीक्षेत दुसरा रेंक मिळवला. पूर्वीची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल शेर्ले व बांदा गावातूनकौतुक होत आहे.