
सावंतवाडी : प्रा. उदय खानोलकर वाचन मंदिर,मळगाव आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मळगाव वाचन मंदिर येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत शालेय गटात विविध माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत वेंगुर्ले येथील न्यू इग्लिश स्कूल, उभादांडा प्रशालेच्या आर्या सुयोग सातोसकर हिने शालेय गटात द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले
आर्या सातोसकर हिला प्रा. वैभव खानोलकर आणि अजित केरकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक आर्या आणि दोन्ही मार्गदर्शकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर आणि संस्थाध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर, सचिव रमेश नरसुले तसेच संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले असून या यशाबद्दल आर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.