चुलत भावाचा खून ; संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 22, 2025 15:59 PM
views 272  views

देवगड : वरेरी कुळये सडेवाडीनजीक चिरेखाणीवरील खून प्रकरणी संशयित आरोपी रितीक दिनेश यादव याला देवगड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडीनजीक चिरेखाणीवर परप्रांतीय कामगार कृष्णकुमार जुगराज यादव (२०, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्या डोक्यात ट्रकमधील व्हील पान्याने प्रहार करून त्याचा खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला त्याचा चुलत भाऊ रितीक दिनेश यादव (२०, मूळ रा. मध्यप्रदेश) या संशयिताला देवगड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांन कडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वरेरी कुळये सडेवाडीनजीक शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेत उमेश गंगाराम गवाणकर यांची चिरेखाण आहे. या चिरेखाणीवर कृष्णकुमार यादव व संशयित रितीक यादव हे दोघे कामास होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये एका शुल्लक कारणावरून वाद झाला व त्या वादाचा राग मनात ठेवून संशयित रितीक यादव याने कृष्णकुमार याच्या डोक्यात ट्रकमधील व्हिल पान्याने प्रहार करून त्याचा खून केला. ही घटना १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. याप्रकरणी चिरेखाणीचे मुकादम विजय शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी संशयित रितीक यादव याला तात्काळ अटक करून देवगड न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने संशयिताला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने संशयित रितीक यादव याला पुन्हा देवगड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या कडू या घटने विषयीचा अधिक  तपास सुरू आहे.