इनरव्हील क्लबकडून सुषमा मांजरेकर यांचा सन्मान...!

Edited by: विनायक गावस
Published on: September 26, 2023 17:14 PM
views 95  views

सावंतावडी : इनरव्हील क्लब सावंतवाडीतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर यांच्या निवासस्थानी जात सत्कार केला.

शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन प्रा. मांजरेकर यांचा सन्मान केला. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रिया रेडिज, माजी अध्यक्षा दर्शना रासम, प्रा. सुमेधा नाईक, डॉ. मीना जोशी व सौ. नाईक उपस्थित होत्या. यावेळी रेडिज यांनी  मांजरेकर यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करीत यापुढेही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या.