सुषमा अंधारेंचं शिवसेना महिला आघाडीच्यावतीने स्वागत

Edited by:
Published on: May 10, 2025 18:42 PM
views 191  views

कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ व मालवण शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान कुडाळ शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस सभागृह येथे तर मालवण शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मालवण लीलांजली हॉल येथे सुषमा अंधारे यांनी  बैठक घेत महिला संघटनेचा आढावा घेतला.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला पदाधिकाऱ्यांनी गावागावात फिरून महिलांच्या समस्या सोडवाव्यात, महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवून संघटना वाढीसाठी मेहनत घ्यावी असे आवाहन यावेळी सुषमा अंधारे यांनी  केले.  

याप्रसंगी कुडाळ येथे महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, कुडाळ तालुकासंघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, अतुल बंगे, अमित राणे, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, शहरप्रमुख मेघा सुकी, जान्हवी पालव, स्नेहा परब, संजना सावंत, अस्मिता गावडे आदी महिला उपस्थित होत्या. 

मालवण येथे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण,तालुका संघटक दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, पेंडुर विभाग संघटक लता खोत, उपतालुका संघटक पूजा तोंडवळकर, युवती सेना तालुका संघटक भाग्यश्री लाकडे, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर, नीना मुंबरकर, लक्ष्मी पेडणेकर, विद्या फर्नांडीस, सौरभी अमरे,लक्ष्मी माणगावकर आदी उपस्थित होते.