मिठबावात सुशांत नाईकांचा 'गाव दौरा बैठका' !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 20, 2024 13:09 PM
views 385  views

देवगड : कणकवली विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशनुसार संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह संपन्न होत आहे. यनिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा गाव दौरा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृ्वाखाली कुणकेश्वर जिल्हा परिषद मधील मिठमुंबरी, कातवन, मिठभाव, हिंदळे, पोयरे, मुणगे, नारींग्रे, खुडी या गावात गाव दौरा बैठका संपन्न झाल्या. 

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत युवासेना देवगड तालुका प्रमुख गणेश गांवकर, मनोज भावे,यशपाल मुंबरकर, संदीप मुंबरकर, तुकाराम गांवकर, राजेंद्र गांवकर, मनोज तोडणकर, समाधान तोडणकर, मंगेश गांवकर, उल्हास गांवकर, रोहन तारी, संतोष गांवकर, बशीर शेख, मनोज गांवकर, गुरुदेव गांवकर, बापू मुंबरकर, बबन मुंबरकर, संदीप मुंबरकर, किरण डामरी, तेजस वाघट, बशीर मुजावर, अमित तोडणकर, समाधान तोडणकर, विवेकानंद कातवनकर, संजय आचरेकर, संजय कातवनकर,प्रभाकर कातवनकर, नितीन तर्फे, सचिन शिंदे, संजय आचरेकर, राजू भुजबळ, भास्कर गावखडकर, गणेश जेठे, शिवदास नरे, गणपत धुरत, मकरंद शिंदे, मंगेश मयेकर,कोळमकर महेश, भाऊ मयेकर, दत्तप्रसाद धुरी, रुपेश पाटील, स्नेहा मयेकर, प्रसाद घाडी, दिनेश मेस्त्री, बाळा सावंत, प्रमोद वळंजू, प्रमोद सावंत, गुरु धुवाळी, दीपक परब, हरिश्चंद्र आडकर, मंदार मुणगेकर, तुषार आडकर, गणेश सारंग, बाबू लाड, दीपक कदम, काशीराम घाडीगावकर,सुदाम घाडीगावकर, कृष्णा जाईल, सागर मेस्त्री, निलेश कामतेकर, प्रदीप घाडी, बाबाजी घाडी, संतोष मुणगेकर, सचिन गुडेकर, हर्षल मेस्त्री, संदीप घाडी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी थेट गावच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. येत्या काळात विधासभेवर भगवा फडकवून पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना विराजमान करायचे आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले. येत्या काळात आपण जोमाने काम करून कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज होऊया. यासाठी प्रत्येक गावात एक प्रचार कमिटी नेमण्यात आली आहे. या कमिटीने गावात घरोघरी मशाल चिन्ह पोहचवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.