कुडाळमध्ये उद्या सुषमा अंधारेंची तोफ धडाडणार

Edited by:
Published on: November 14, 2024 16:35 PM
views 388  views

कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा होतेय. 

 उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणात होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.