सूर्यकांत सुकी यांचं निधन...!

Edited by:
Published on: March 21, 2024 13:38 PM
views 272  views

सिंधुदुर्गनगरी : घावनळे खोचरेवाडी येथे राहणारे गणपती शाळा व्यवसायिक सूर्यकांत सखाराम सुकी ७५ यांचे त्यांच्या राहत्या घरी बुधवार २० मार्च रोजी सायंकाळी ७ वां सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,एक विवाहित मुलगी,सून,दोन भाऊ, भावजया,पुतणे,पुतण्या,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सूर्यकांत सुकी यांना घवनळे आदी परिसरात दादा सुकी म्हणून ओळखले जात होते.त्यांचे या परिसरात सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान होते.मुंबई सारख्या शहरात सुरुवातीच्या काळात त्यांचा टेलरींगचा व्यवसाय होता.त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर  त्यांनी गावी येऊन आपल्या गावातील घर,शेती तसेच वडिलोपार्जित गणपती बनविण्याचा व्यवसाय सुरू ठेवला होता.गणपती बनविणे हा व्यवसाय न मानता त्यांनी ती एक सेवा म्हणून काम सुरू ठेवले होते.त्यामुळे त्यांनी कधीही गणपती मूर्तीची किमत्त सांगितली नाही.समोरची व्यक्ती जे काही पुढे करेल ती रक्कम ते हसत मुखाने घेऊन न मोजता ठेवत असत.त्यांच्यावर गुरुवारी येथील स्मशान भूमीत अंत्यविधी करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.त्यांच्या जाण्याने घावनळे परिसरावर शोककळा पसरली आहे.