
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या उपरलकर स्मशानभूमीतील रॅक व फाउंडेशन दुरूस्तीबाबत माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी मुख्याधिकारी यांचे वारंवार लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केल्याने ८ दिवसांत येथील दुरूस्ती न केल्यास १५ ऑगस्टला स्मशानभूमीत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.
माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी नगरपरिषदेच्या उपरलकर स्मशानभूमीतील अग्नी देण्यासाठीचे रॅक व फाउंडेशन दुरूस्तीबाबत वारंवार प्रशासनाच लक्ष वेधून देखील त्याकडे दुर्लक्ष केले गेले. या रॅकची दुरावस्था झाली असून अग्नी देताना त्रास सहन करावा लागतो. १४ ऑगस्ट पर्यंत येथील दुरूस्ती न केल्यास नाईलाजास्तव १५ ऑगस्टला न.प. प्रशासना विरोधात स्मशानभूमीत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी दिला आहे.