सुप्रिया सुळे सलग आठव्यांदा ठरल्या संसदरत्न

अर्चना घारेंनी भेट घेत दिल्या शुभेच्छा
Edited by: विनायक गावस
Published on: November 15, 2023 15:37 PM
views 189  views

सावंतवाडी : संसदेत विशेष कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांना प्राईम फाउंडेशनच्या वतीने "संसदरत्न" पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जनतेच्या सेवेसाठी संसदेच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे सलग आठव्यांदा या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

त्यांच्या समर्पित सेवाकार्याचा हा सन्मान असून सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी गोविंद बाग, बारामती येथे त्यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी संदीप घारे उपस्थित होते ‌