
सावंतवाडी : दिव्यांग बांधवांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी साथ दर्शविली. आज कार्यालयात येऊन भेट घेत पाठिंबा केला जाहीर केला.
सौ अर्चना घारे परब अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले. यावेळी हरी भरत गांवकर ( मळगाव) ,जयेंद्र सीताराम राऊळ (कलबिस्त) , विठ्ठल भास्कर शिरोडकर (कुडाळ ) , अरविंद नारायण लिंगवत ( वेर्ले ) आदी दीव्यांग बांधव उपस्थित होते.