
कुडाळ : जालना येथे मराठा समाजाच्या बांधवांवर जो लाठीचार्ज झाला त्या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी समाजाकडून निषेध करण्यात आला आहे.
याबाबत शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारकडून ही हिटलरशाही सुरू असून भविष्यात आरक्षणासाठी होणारी अन्य समाजाची आंदोलनेही दडपण्याचा प्रकार राज्य सरकारकडून केला जाईल. हा मराठा बांधवांवर झालेला हल्ला अमानुष आहे. जालना घटनेचा निषेध म्हणून उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीमध्ये मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा असल्याचे शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर आणि कुडाळ शहर ओबीसी सेल प्रमुख राजू गवंडे यांनी स्पष्ट केले.