'स्थानिक व्यापाऱ्यांना साथ द्या, त्यांच्याकडूनच दिवाळीची खरेदी करा'

मनसेचे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर यांचं आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: October 22, 2022 16:56 PM
views 168  views

सावंतवाडी : सध्या ऑनलाईन जमाना झाल्यामुळे प्रत्येक जण ऑनलाईन खरेदी करण्याकडे भर देत आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांकडे ग्राहकांचा दुर्लक्ष होताना दिसत आहे.

कोव्हीड काळात ह्या व्यापारी वर्गानं सामाजिक भान राखत काम केलं. ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी नुकसानाची चिंता केली नाही. गोरगरिबांना मदतीसाठी पुढाकार घेतला. आता दिवाळी सण आला असून कोरोनासारख्या जागतिक महामारीनंतर प्रथमच बाजारपेठ पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहकांना विदेशी कंपन्या आमिष दाखवत आहेत. पण आपल्या अडीअडचणीच्या काळात आपला स्थानिक व्यापारीच आपल्या गरजेला उपयोगी आला आहे हे विसरू नये.

आपल्या सणांत, सुखदुःखात स्थानिक व्यापारीच मदतीला येतात. सणासुदीला वर्गणीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुढाकार घेतात. त्यामुळे या दिवाळीत ऑनलाइन खरेदी करणे टाळा व स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्या असे आवाहन मनसेचे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर यांनी केल आहे.