जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा

दोडामार्ग उबाठा शिवसेनेकडून साखळी उपोषण
Edited by: संदीप देसाई
Published on: November 02, 2023 16:24 PM
views 68  views

दोडामार्ग : राज्यामध्ये मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज दोडामार्ग उबाठा शिवसेनेच्या वतीने दोडामार्ग तहसील कार्यालय येथे साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

यावेळी मोठ्यां संख्येने मराठा बांधवानी या साखळी उपोषणास पाठिंबा दर्शविला उबाठा चे उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, मिलिंद नाईक, लक्ष्मण आयनोडकर, महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस, महिला उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी, संपदा देसाई,  लोबो, बाळू गवस आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.