कोलगावचे रविकिशोर चव्हाण यांची भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती

Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2023 14:46 PM
views 484  views

सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव येथील रहिवाशी रविकिशोर सदाशिव चव्हाण यांची भारतीय आयुर्विमा महामंडळ, मुंबई इथ अधीक्षक अभियंता या पदावर पदोन्नती झाली आहे. ते जयपूर राजस्थान येथे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर या पदावर कार्यरत होते. त्याआधी तीन वर्षे ते दिल्ली येथे कार्यरत होते. श्री चव्हाण हे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई या कॉलेजचे रँकर विद्यार्थी होते. त्यांनी फायनान्स मध्ये एमबीए पण केले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळच्या सेवेत असतानाही ते विविध सामजिक उपक्रम राबवत असतात आणि सहभागी होत असतात.त्यांच्या पदोन्नतीमुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.