LIVE UPDATES

सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ यांचा सत्कार

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 04, 2026 21:29 PM
views 17  views

सावंतवाडी : सैनिक पतसंस्थेचे व सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्थेचे अध्यक्ष  सुनील राऊळ यांचा सत्कार स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी तर्फे करण्यात आला. यावेळी सहकारातील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद नम्रतेने, स्पष्ट, गोड पणे साधावा. ग्राहक आपला देव समजून आदराने वागावे, संस्थे बद्दल आपुलकी, तळमळ, कार्यतत्परता असावी. संस्थेची प्रगती होईल तशी कर्मचाऱ्यांना देखील त्याचा उत्तम मोबदला मिळू शकेल असे उद्गार यावेळी श्री. राऊळ यांनी यावेळी काढले. सहकार दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्नेह पतसंस्थेच्या मुख्याधिकारी सौ.संगीता प्रभू यांनी मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी आपल्या भाषणात सहकारातून समृद्धी याचा खुलासा केला. यावेळी सुनील राऊळ यांचा शाल,श्रीफळ व भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला.