LIVE UPDATES

भुईबावडा घाटातून एकेरी वाहतूक सुरू

पालकमंत्री नितेश राणेंची प्रशासनाशी चर्चा
Edited by:
Published on: July 04, 2026 22:58 PM
views 92  views

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात आज रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. मात्र, प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला आहे. यामुळे घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. 


या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाशी चर्चा केली. दरड कोसळण्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळाकडे रवाना झाले होते. रात्रीची वेळ असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने रस्ता साफ करण्याच्या कामात काही प्रमाणात अडथळे येत होते. मात्र, प्रशासनाच्या प्रयत्नाने रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला असून यामुळे घाटमार्गातून एकेरी वाहतूकीस प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून घाट मार्गात वाढणारे प्रकार बघात मोठी हानी घडू नये यासाठी खबरदारी घेत उपाययोजना करावी अशीही मागणी होत आहे.