सुंदर पार्सेकर यांनी पोलिसांविरोधातच छेडलंय उपोषण, हे आहे कारण

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 11, 2023 16:35 PM
views 125  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली पार्सेवाडीतील सुंदर बाबुराव पार्सेकर यांना पोलिसांविरोधात आंदोलन छेडण्याची वेळ आलीय. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी इमिंग डिसोजा आणि सातार्डा बीटचे पोलीस हवालदार गुरुनाथ नाईक यांना बडतर्फ करण्याची त्यांची मागणी आहे. 


पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० जानेवारी २०२२ ला पंचनामा न करता सुंदर पार्सेकर यांची चारचाकी गाडी Maximo Plus 1950 WB Reg. No. GA-07-F-3710 ही बेकायदेशीररीत्या सावंतवाडी पोलीस ठाण्च्या हद्दीत आपल्या ताब्यात ठेवून, 19 महिन्यांचे  दीड लाख, मेंटेनन्स ४ लाख मिळून १३.५० लाख रुपयांचे नुकसान केले. या आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या तत्कालीन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी इमिंग डिसोजा यांच्या वेतनातून व मालमत्तेतून रक्कम रु.१३ लाख ५० हजार वसूल करून त्यांच्यासह सातार्डा बीटचे पोलीस हवालदार गुरुनाथ नाईक यांना पोलीस सेवेतून तात्काळ निलंबित करा. तसेच, त्यांची विभागीय, खातेनिहाय चौकशी करुन, चौकशीअंती बडतर्फची कारवाई करावी. या मागण्यांसाठी सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली पार्सेवाडी येथील सुंदर बाबुराव पार्सेकर यांनी  पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले आहे.