
सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूल येथे आजपासून दोन दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले या समर कॅम्प साठी शाळेच्या मुलांनी उल्लेखनीय उपस्थिती दर्शवली. समर कॅम्पमध्ये मुलांचा विकास मनोरंजनात्मक पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला या समर कॅम्पचे उद्घाटन आज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी फादर नेस्टर ,फादर शेल्डन,आणि फादर इन्फान्सिओ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रशालेचे प्राचार्य फादर रिचर्ड सालदाना यांनी या समर कॅम्पची जोमाने सुरुवात केली.