
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या अनेक सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्यासाठी दाते पुढे सरसावत आहेत. कै. प्रभाकर आराबेकर यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा बजावली होती. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती सुमेधा अराबेकर यांनी रुग्णांसाठी उपयोगी वस्तू खरेदी करण्याकरिता ३५ हजार रुपयांचा धनादेश सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानजवळ सुपूर्द केला. यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची शिफारस त्यांच्याकडे केली होती. कळसुलकर शाळेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते दत्तप्रसाद गोटस्कर यांनी या सेवाभावी संस्थेचे नाव सुचवले होते. या सर्वांचे रवी जाधव यांनी आभार मानले. या पैशांमध्ये लवकरात लवकर रुग्णोपयोगी वस्तू खरेदी करून त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी दिल्या जातील असे त्यांनी सांगितले.