
चिपळूण : टेरवचे मा. सरपंच कै. शंकरराव रामाजीराव कदम, यांच्या पत्नी सुलोचना उर्फ अनुसया कदम राधाकृष्णवाडी, यांचे शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी ठाणे येथे वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै. शंकरराव यांच्या घराण्याला सामाजिक प्रतिष्ठा लाभल्याने व दसपटी विभागात सुपरिचित असल्याने घरी येणाऱ्या सर्वांची अदबीने चौकशी करणे, यथोचित पाहुणचार करणे यात त्यांच्या हातखंडा होता. त्यांचे प्रेमळ व आपुलकीने स्मित हास्य करून बोलणं सर्वांना भारावून टाकणारे असे होते. त्यांच्या पश्चात पुतणे, भाच्या, भाचे जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. सुलोचना उर्फ अनुसया यांच्या निधनामुळे समस्त ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचे दशक्रिया विधी रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजता टेरव वैकुंठ भूमी येथे होणार असून सपेंडी व उत्तरकार्य मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी समृद्धी बंगला, भवानी पेठ टेरव येथे होणार आहे. तरी सर्व भाऊबंद, सगे सोयरे आणि पाहुणे मंडळींनी येऊन दुःख विसर्जन करावे असे त्यांचे पुतणे श्री चंद्रकांत हणमंतराव कदम यांनी कळविले आहे.