कळणेत सुलक्षणा देसाई ठरल्या पैठणीच्या मानकरी !

Edited by: संदीप देसाई
Published on: January 11, 2024 07:44 AM
views 101  views

दोडामार्ग :  गावात सामाजिक एकोपा नांदावा, महिलांना व्यासपीठ मिळावे आणि मैत्रीपूर्ण नाते दृढ व्हावे या उद्देशाने कळणे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संजय तुकाराम देसाई यांच्या संकल्पनेतून गावात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविधरंगी स्पर्धेत सुलक्षणा संदेश देसाई यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे त्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. 

तर केतकी कमलाकर देसाई या द्वितीय, आरती संदेश देसाई यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत एकूण ३० महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून चित्रकार दिलीप देसाई व ॲड. सोनू गवस यांनी काम पाहिले. या स्पर्धेची सुरावात व सांगता निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी गावचे सरपंच अजित देसाई, गावचे मुख्य मानकरी सखाराम देसाई, उपसरपंच काका देसाई, पोलीस पाटील कल्पेश कांबळे, सदस्य प्रमोद ठोंबरे, शाहीर खान, शरद देसाई, पुरुषोत्तम देसाई यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल सुनीता भिसे, ग्रा.पं. सदस्य सुषमा सावंत यांनी विशेष मेहनत घेतली.