सुधीर आडीवरेकर यांची ओपन जिम सुरु करण्याची मागणी...!

Edited by:
Published on: November 13, 2023 10:16 AM
views 157  views

सावंतवाडी : माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर यांच ओपन जिम संदर्भात लक्ष वेधल. जुनाबाजार होळीचा खुंट येथील नगरपरिषदेच्या जागेत ओपन जिम सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी दीपक केसरकर यांनी जागेची पाहणी केली. नरेंद्र डोंगरावर शेकडो नागरिक मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करीता जात असतात.

त्यांना याठिकाणी जिम सुविधा उपलब्ध करून दिल्यास व्यायाम करता येईल. युवा वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना देखील त्याचा फायदा होईल असं मत यावेळी सुधीर आडीवरेकर यांनी व्यक्त केले. तर हे ओपन जिम लवकरच कार्यान्वित करण्यात येईल असं आश्वासन दीपक केसरकर यांनी दिल. याप्रसंगी देव्या सुर्याजी, रवी बांदेकर, किशोर चिटणीस, गुरुप्रसाद चिटणीस, राघू चितारी आदी उपस्थित होते.