
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा भागात सुरु असलेल्या गटार योजनेच्या कामाची पहाणी माजी आरोग्य सभापती तथा स्थानिक नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत केली. यावेळी बांधकाम अधिकारी गजबार यांना त्या संदर्भातल्या सुचना दिल्या. संजू परब नगराध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून व सुधीर आडिवरेकर यांच्या पाठपुराव्यानंतर हे काम मंजूर झालं होतं. या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली असून याची पहाणी करण्यात आली.
यावेळी सुधीर आडिवरेकर यांनी रहदारीचा रस्ता असल्याने व शाळा जवळ असल्यानं माती, दगड हटविण्यात यावेत, तसेच ख्रिसमस सण जवळ येत असल्यानं हे काम जलदगतीने पुर्ण करण्याच्या सुचना अधिकाऱ्यासह कंत्राटदाराला केल्या. यावेळी विनोद सावंत, नागेश जगताप, अमित गवंडळकर, अनिल सावंत, संतोष सावंत, अथर्व सावंत आदी उपस्थित होते.