शहरात 'मन की बात'च्या सेंच्युरीला तुफान प्रतिसाद

सुधीर आडीवरेकर यांचा उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2023 12:11 PM
views 205  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज (30 एप्रिल) प्रसारित झाला. हा 100 वा भाग आज सकाळी 11 वाजता प्रसारित झाला. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी भाजप युवा नेते माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी जोरदार तयारी केली होती. हा सोहळा शहरात मोठ्या दिमाखात पार पडला. याप्रसंगी माजी सभापती अँड. परिमल नाईक, भाजप महिला शहराध्यक्ष मोहीनी मडगावकर, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.