
मालवण : मालवणात अचानक सोसाट्याचा वारा आणि गडगडाटासह आलेल्या पावसाने साऱ्यांची तारांबळ उडाली. ऐन भात कापणीच्या दिवसात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
गेले दोन दिवस मालवणात प्रचंड उष्मा होता. या उकाड्याने मालवण वासिय हैराण झाले होते. आज दुपारपासून गडगडाटास सुरुवात झाली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. सध्या भात कापणी सुरु आहे. आधीच पाऊस उशिरा आल्याने शेती उशिरा झाली आहे. त्यात आता भात कापणीच्या दिवसात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.