सविता धुरी यांचं आकस्मिक निधन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 23, 2024 14:00 PM
views 106  views

देवगड : देवगड -  मुणगे आडबंदर गावच्या जेष्ठ सदस्या सविता मधुकर धुरी सध्या वास्तव्य मुंबई जोगेश्वरी(पूर्व) शामनगर यांचे दि. २२ आगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या मुत्यूसमयी ७० वर्षाच्या होत्या. त्यांना आजवर कोणत्याही आजार नव्हता. त्यांचे तांबळडेग हे  माहेर असल्याने त्या पूर्वाश्रमीच्या रंजनी लक्ष्मण कांदळगावकर या नावाने सर्वत्र ओळखल्या जात होत्या. त्यांचे पती नौसेना युनियन नेते स्वर्गीय मधुकर धुरी यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी जोगेश्वरी येथील सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभागातून आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. मुळात त्या विठ्ठलभक्त होत्या. हा वारसा वडिलांकडून आलेला होता त्यांनी तो जपला. नेहमी हसतमुख परोपकारी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या रंजनी यांनी कांदळगावकर धुरी कुटुंबांना एकत्रित ठेवून अखेरच्या श्वासापर्यंत बांधिलकी जपण्यात यशस्वी ठरल्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरा जोगेश्वरी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पश्चात मुलगी उद्योजिका कविता शैलेश कडू, मुलगे सुदेश, निलेश, सुजाता, सुना-नातवंडे असा परिवार आहे.