
वेंगुर्ला : मातोंड गोवळवाडी येथील युवक दर्पण प्रमोद परब (१८) याचा राहत्या घरी मृत्यू झाला. अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान याबाबत वेंगुर्ले पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्याच्या पश्चात आई, वडील, काका, काकी, चुलत भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. अतिशय मनमिळावू असलेल्या दर्पण याच्या आकस्मिक जाण्याने मातोंड गावात शोककळा पसरली आहे.










