
वैभववाडी : कोकण रेल्वेने मुंबई ते गोवा असा प्रवास करणाऱ्या 62 वर्षीय प्रवाशाचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात सदर प्रवाशाला आणले आहे. त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मुंबईहून हे कुटुंब गोव्याला कोकणकन्या गाडीने निघाले होते. राजापुर ते वैभववाडी प्रवासादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.