मुख्यमंत्र्यांची अशीही कार्यतत्परता...!

Edited by:
Published on: July 09, 2023 13:56 PM
views 379  views

ठाणे : गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी - कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली.  

यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे समजले. मात्र, या रुग्णाला दाखल करून घ्यायला रुग्णालयाने नकार दिल्याने या रुग्णाला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले. 

अखेर क्षणाचाही विलंब न करता ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच रुग्णाला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.