
सावंतवाडी : कुणकेरीतील गुरुदास कुणकेरकर यांना सावंतवाडी बस स्टँडसमोर पंच द्रविड बँकेचे पासबुक व पैसे असलेली पिशवी सापडली. ही पिशवी घेवून ते माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गुरुकुल मध्ये गेले.
साळगावकर त्याला घेवून पंच द्रविड बँकमध्ये गेले असता पैसे हरवलेली मणेरिकर नामक व्यक्ती तिथेच बसली होती. पैसे व पासबुक असलेली पिशवी बँक मॅनेजर समक्ष त्यांना देण्यात आली. गुरुदास कुणकेरकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.