
वेंगुर्ले : वेळागर उपोषणा संदर्भात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी माजी आमदार राजन तेली यांनी वेळागर परिसरातील गावठण क्षेत्र ताज प्रकल्पातून वगळण्याबाबत कॉन्फरन्स कॉलद्वारे चर्चा केली. लवकरच उपोषणकर्ते ग्रामस्थ आणि ताज ग्रुप सोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. सकारात्मक संवाद आणि होणाऱ्या बैठकीमुळे आंदोलकांनी उपोषण मागे घेतले.