आरक्षण लढ्याला यश | दोडामार्गमध्ये आनंदोत्सव

Edited by: संदीप देसाई
Published on: January 27, 2024 14:15 PM
views 198  views

दोडामार्ग :  मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला अखेर शनिवारी मोठ यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या लढ्याच कौतुक केलं. इतकचं नव्हे तर अपेक्षित अध्याध्यश काढत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिल्याने  मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला. त्याच पार्श्व भूमीवर दोडामार्ग शहरातील मुख्य पिंपळेश्वर चौकात तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी व मोठी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. 

मराठा आंदोलनाला यश मिळताच येथील अनेक मराठा बांधवांच्या चेहऱ्यावर एकच हास्य फुलले होते.  'जय शिवराय जय जिजाऊ, छ. शिवाजी महाराज की जय, अरे आवाज कुणाचा ... मराठ्यांचा, एक मराठा.. लाख मराठा 'अशा घोषणांनी संपूर्ण शहर परिसर दुमदुमून सोडला होता. यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष ऍड. सोनू गवस, तसेच वैभव इनामदार, विठ्ठल दळवी, संदीप घाडी, गणेशप्रसाद गवस, बाबुराव धुरी, दादा देसाई, गोपाळ गवस, राजेंद्र निंबाळकर, रामदास मेस्त्री, नीलम गवस, प्रा. संदीप गवस, बाबू मळीक, सुनील सावंत, आनंद डावरे, सुदेश तुळसकर, श्रीराम गवस, महेश गवस, आदीसह मराठा बांधव उपस्थित होते.