
सावंतवाडी : कोल्हापूरमध्ये डिसेंबर 2024 ला झालेल्या 'प्रोऍक्टिव्ह अबॅकस समर कॉम्पिटिशन'मध्ये 'स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेन्टर च्या 20 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले तर नुकत्याचा झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 'स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सावंतवाडी - वेंगुर्ला' सेंटर च्या 20 मुलांनी यश मिळवले याबाबत मुलांचा बक्षिस वितरण सोहळा विविध कार्यक्रमाने वेगुर्ले येथे पार पडला.
या स्पर्धेत इयत्तेप्रमाणे कॅटेगरी होती. तर या मध्ये छोटा गट आर्यन झोरे (महाराष्ट्रात तिसरा तर भारतात 11वा आला 4.22ms 99/100)शिवम जगताप (महाराष्ट्रात चौथा तर भारतात 21वा 97/100), आराध्या झोरे (महाराष्ट्रात तिसरी तर भारतात 19 वी 93/100), तेजस्वी पारकर (महाराष्ट्रात दुसरी तर भारतात 18 वी 95/100), हर्ष राणे (महाराष्ट्रात पहिला तर भारतात 17वा 97/100), भास्कर गावडे (महाराष्ट्रात दुसरा तर भारतात 19 वा 97/100), हर्ष नाईक महाराष्ट्रात चौथा 93/100), गौरांग वेलकर महाराष्ट्रात चौथा 93/100), तनिष चमणकर (महाराष्ट्रात दुसरा तर भारतात 19 वा 97/100), यशराज पारकर (महाराष्ट्रात तिसरा तर भारतात 29 वा 95/100)जयेश गावडे (महाराष्ट्रात तिसरा तर भारतात 25 वा 98/100), मोठ्या गटातून विनायक नाईक (महाराष्ट्रात पहिला तर भारतात 20 वा ( 99/100), कनिष्का गावडे (महाराष्ट्रात पहिली तर भारतात 21वी ) तनया गावडे (महाराष्ट्रात पहिली तर भारतात 19 वी 97/100), लावण्या गावडे महाराष्ट्रात चौथी 91/100), राज नवार (महाराष्ट्रात पहिला तर भारतात 11वा 100/100), गौरव कासवकर महाराष्ट्रात पाचवा तर भारतात 24वा 89/100), प्रणव गावडे महाराष्ट्रात दुसरा तर भारतात 98/100) तनाज सय्यद महाराष्ट्रात पाचवी तर भारतात 10 वी 91/100),यज्ञेश गावडे महाराष्ट्रात सातवा तर भारतात 15 वा 89/100) प्रोऍक्टिव्ह अबॅकस या स्पर्धेच्या युगात नेहमीच मुलांसाठी नव नवीन स्पर्धा परीक्षा घेतात आणि मुलांना याचा शालेय अभ्यासात खुप फायदा होतो या प्रोऍक्टिव्ह अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये 'स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस'सावंतवाडी -वेंगुर्ला सेंटर सहभागी विद्यार्थ्यानी अचूक गणिते सोडवून ट्रॉफी चे मानकरी झाले. स्पर्धेचे स्वरूप 6 मिनिट मध्ये 100 गणिते सोडवणे असे होते. आजकाल च्या स्पर्धेच्या युगात कमीत कमी वेळेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करत आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भर पडत असते. विजेत्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविन्य मिळवले आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून निवडून आलेल्या या मुलांचे त्यांच्या शाळांमधून खुप कौतुक होत आहे.
या विजेत्या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा कौतुक व्हावे यासाठी कौतुक सोहळा वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला होता.विजेता विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम नुकताच सातेरी मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ला पोलीस, योगेश वेंगुर्लेकर व मनोज परुळेकर, श्री संजय गावडे वेंगुर्ला - उपतालुकाप्रमुख शिवसेना उभादांडा, वेंगुर्ला सरपंच निलेश चमणकर आणि अणसूर,वेंगुर्ला सरपंच सत्यविजय गावडे तसेच स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस च्या संचालिका कोमल मेस्त्री मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार शुभम धुरी यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले.
या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मुलांसाठी प्रेरणा देणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या तसेच शैक्षणिक दृष्ट्या काही मार्गदर्शन केले.
तसेच संजय गावडे व निलेश चमणकर यांनी मातीला आणि दगडाला आकार देऊन त्यातून एक आकर्षक सुंदर मूर्ती बनवण्याच काम म्हणजे प्रोऍक्टिव्ह अबॅकस असा उल्लेख केला. अबॅकस शिकणारे विद्यार्थिही अश्याचा प्रकारे घडविले जात आहेत. अश्या प्रकारे आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात एक विरंगुळा म्हणून पालकांना त्यांच्या रोजच्या व्यस्त जीवनातून थोडासा वेळ स्वतःसाठी म्हणून काही मनोरंजक खेळ ठेवले होते तर पालकांनी विद्यार्थ्यांसोबत ते अगदी आनंदात खेळून एक अविस्मरणीय आनंद घेतला.अश्या प्रकारे हसत खेळत कार्यक्रम पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 'स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सावंतवाडी -वेंगुर्ला'शाखेच्या संचालिका कोमल मेस्त्री मॅडम यांचे खुप मोठे सहकार्य लाभले आहे.विजेत्या विद्यार्थ्यांचे खप खुप अभिनंदन व्यक्त केले जात आहे. स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस, सावंतवाडी-वेंगुर्ला या सेन्टरला बेस्ट सेन्टर हा 3 वेळा किताब मिळाला आहे. कार्यक्रमात प्रोऍक्टिव्ह अबॅकस चे डायरेक्टर गिरीश करडे, सारिका करडे, तेजस्विनी सावंत, मार्केटिंग हेड अजय मणियार, ज्योती व सर्व प्रोऍक्टिव्ह टीम चे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांना संचालिका कोमल मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले.